चौलमळा येथे शस्त्रास्त्रे, नाण्यांचे प्रदर्शन

शिवकालीन बैठ्या खेळांबाबत उत्सुकता
। चौल । प्रतिनिधी ।
इतिहासकाळात बुद्धी तल्लख व्हावी, मानसिक स्थिती सक्षम राहावील, यासाठी युद्धाला जाण्याअगोदर बुद्धीला चालना देणारे बैइे खेळ खेळले जात असत. असशा विविध बैठ्या खेळांचे एक अनोखे प्रदर्शन अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथे कृष्णादेवीच्या उत्सवानिमित्त दि. 2 मे रोजी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास पंचक्रोशितील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
अलिबाग तालुक्यातील चौल नगरीलादेखील ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. अशा 350 हून अधिक मंदिरांची भूमी असलेल्या चौल नगरीतील चौलमळा या गावी आ.प.ला. कट्टा संस्था, ऐरोली-नवी मुंबईच्या माध्यमातून गडकिल्ले छायाचित्रे, पुरातन बैठे खेळ, मुद्रांक, शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाणी, मोडी लिपी पत्रे आदी वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी चौलमळा युवक मंडळाच्या वतीने मोठा शामियाना तयार करण्यात आला होता. त्यामध्ये उत्तम प्रकारे मांडणी करण्यात आली होती.

या प्रदर्शनातील विविध शस्त्रांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती. तसेच विविध प्रकारच्या बैठ्या खेळांमध्ये अनेक जण रमलेले पाहायला मिळाले. मनोरंजनासोबत युद्धासाठी खेळांचा कसा उपयोग होत होता, याची माहिती अभ्यासक पंकज भोसले यांनी दिली. दगडावर कोरलेल्या खेळापासून ते अगदी लाकूड, कपडे आदींवर हे खेळ बनवले आहेत. मंकला, विमानाम, चतुरंग, अक्स दुता, गंजिफा, कवड्या असे खेळ शिवकाळात खेळले जात असत. ते प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दरम्यान, श्रावणी भोसले यांनी प्रदर्शनात असणार्‍या सर्व बैठ्या खेळांबाबत इंत्थभूत माहिती दिली. सोबतच सिद्धेश गुरव यांनी नाणी, तोफा, गोळे, भाले, वाघनखे, तलवारी आदी शस्त्रास्त्रांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. चौलमळा येथे प्रदर्शन भरविण्यात मनीष घरत यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या सहकार्यामुळेच सर्वांना शिवकाळातील माहिती प्राप्त झाली. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कृष्णादेवी युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

आजच्या मोबाईलच्या युगात मुलांच्या दृष्टीवर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यांच्या जडणघडणीवर बदल होताना दिसत आहे. त्यामुळे मुलांनी अशा जुन्या बैठ्या खेळांकडे वळल्यास त्यांचा बौद्धिक विकास घडेल, त्यांची विचारशक्ती वाढेल, तंनी एखादा खेळ स्वतः बनविल्यास त्यांची कल्पकता दिसून येईल, त्यामुळे अशा खेळांचा त्यांना नक्कीच उपयोग होऊ शकेल. – पंकज भोसले, ऐतिहासिक खेळांचे अभ्यासक

Exit mobile version