तळोजात अंमली पदार्थांची विल्हेवाट

| पनवेल | वार्ताहर |

मुंबईच्या सीमा शुल्क विभागाने विविध कारवाया आणि छापे मारून जप्त केलेल्या 2 कोटी 16 लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थ साठ्याची तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात विल्हेवाट लावून ते नष्ट केले आहे. दरम्यान, कायदेशीर प्रकिया करून शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांची रितसर विल्हेवाट लावल्याचे सीमा शुल्क विभागाने सोशल मीडियाद्वारे कळविले आहे.

सध्या सुरू असलेल्या विशेष मोहिमेत एपीएससी आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन 3 ने जप्त केलेले हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे. यामध्ये गांजा, कोकेन, चरस, ट्रमाडोल आणि इफेड्रिन यासह 28 किलो एनडीपीएस पदार्थाचा समावेश आहे. विल्हेवाट लाललेल्या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे 2 कोटी 16 लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, यापूर्वी गत वर्षात फेब्रुवारी महिन्यात, तळोजा विभागात कस्टम विभागाने विशेष मोहिम राबवून तब्बल 515 कोटींचे अंमली पदार्थ व सिगारेटचा साठा जप्त करून तो नष्ट केला होता. या कारवाईत तब्बल 515 कोटींचे 343 किलोचे अंमली पदार्थ व सायकेटॉफिक पदार्थ ज्यामध्ये 293 किलो हेरॉईन व 50 किलो मेथोटानचा समावेश होता. तसेच, त्यावेळी 15 कोटी रूपयांच्या विदेशी सिगारेटच्या 1 कोटीहून अधिक कांड्याची विल्हेवाट व अंमली पदार्थाची विल्हेवाट डीआयआरब एनसीबी अधिकारी यांच्या उपस्थितीत लावण्यात आली होती.

Exit mobile version