| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग येथे शासकीय ध्वजारोहणानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस तसेच शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा व व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदक मिळाल्याबद्दल, 71 वी आखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत प्राप्त सुवर्ण पदक विजेते पोलिस शिपाई कुशल बनसोडे, पोलिस शिपाई प्रियांका भोगांवकर आणि कारागृह विभाग 2022-23 या वर्षाकरिता प्रशसनीय सेवेबद्दल अशोक चव्हाण व मधुकर कांबळे, शालेय स्तरावरील विविध परीक्षमधील यशासाठी मयंक भोसले, नैसर्गिक आपत्तीमधील सहकार्य व मदतीसाठी अपघातांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ साठलेकर व विजय भोसले यांचा सन्मान करण्यात आला. कस्तूरी भालवलकर, आरवी भालवलकर, आरोहीकटोर, मोनिष्का कटोर यांना माझी कन्या भाग्यश्री पात्र लाभार्थी मुदत ठेव वाटप करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राथमिक शिक्षक संदीप वारगे आदींचा गौरव करण्यात आला.