| तळे | वार्ताहर |
श्रमजीवी फॉउंडेशन दहिसर मुंबई तर्फे गरजु व गरीब विध्यार्थना वह्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला श्रमजीवी फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरेश कावणकर सचिव सुरेश शिगवण, पत्रकार संजय रिकामे, नगरसेवक भास्कर गोळे, नगरसेविका माधुरी घोलप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मिरा शिगवण, रायगड भूषण श्रमजीवीचे सल्लागार पुरुषोत्तम मुळे, केंद्र प्रमुख राऊत, शेवाळे, मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, सुनील बैकर, मितल वावेकर, सुप्रिया घाडगे, मोरे यांचे सह शाळा समिती सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. शाळेची प्रगती पाहून समाज सेवक रायगड भूषण कृष्णा महाडिक यांनी कन्याशाळा दुरुस्तीसाठी 12 लाख रुपयांचा आर्थिक मदत केली असून काम सुरु आहे. मुंबई येथील श्रमजीवीतर्फे रायगड जिल्ह्यातील तळा प्राथमिक तारणे आदिवासीवाडी आंबेळी आदिवासीवाडी येथील तीन शाळामधील 150 विद्याथ्यांना 50 डझन वह्याचे वाटप बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले शेवटी मीतल वावेकर यांनी आभार मानले.