| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या मुरूड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. रविवारी (दि.13) सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम मुरूडमधील उसरोली टेप येथील आगरी समाज हॉलमध्ये होणार आहे. शेकापच्या राज्य सोशल मीडिया सेलच्या प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील तसेच शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी यांनी दिली.
उद्या मुरूडमध्ये नियुक्ती पत्र वाटप

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606