। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग, मुरूड, रोहा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.27) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पीएनपी नाट्यगृह येथे ही सभा घेतली जाणार आहे. विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेकाप जिल्हा कार्यालयीन चिटणीस अजय झुंजारराव यांनी केले आहे.