चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील कुदे गावात शेतकरी कामगार पक्षातर्फे हळदी-कुंकू समारंभ व मुलींना सायकल वाटप कार्यक्रम शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या गावातील काही विद्यार्थिनी अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यांना शिक्षणासाठी व अन्य गोष्टींसाठी पायी चालत जावे लागत होते. या विद्यार्थिनींची दखल घेत जनसामान्यांच्या हाकेला ओ देत कायमच सर्वांना मदतीचा हात पुढे करणार्या शेतकरी कामगार पक्षातर्फे कुदे गावातही शेकापचे कार्यकर्ते रमेश पाटील यांच्यामार्फत आठ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी सुडकोली ग्रा. सदस्या,भारती रमेश पाटील, पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष, विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ, सुडकोली सरपंच, प्रीती तांबटकर, जयवंत तांबटकर, मधू ढेबे, उत्तम रसाळ, नवनीत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.