नेरळमध्ये दिव्यांगांना सायकल, कृत्रिम अवयवांचेे वाटप

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ येथील बापूराव धर्म सभागृह येथे महानगर गॅस लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून दिव्यांगाना सायकल आणि कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्या मदतीने अंध अपंग विकास संस्था, वारे सहकार्य कल्याणकारी संस्था व नेरळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमातून दिव्यांग बांधवाना मोफत कृत्रिम अवयव, सायकल, बॅटरीवरील सायकल वाटप व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नितीन सावंत, सुजाता मनवे, जयवंती हिंदोळा, पंढरीनाथ राऊत, प्रमिला बोराडे, राम राणे, रोहिदास मोरे प्रथमेश मोरे, मंगेश म्हसकर, अंध अपंग संस्थेचे अध्यक्ष अरुण जोशी, अमर साळोखे, सुनील राजे, सुमन लोंगले,, एमिल्कोचे कमलेश यादव, शिक्षक दिलीप घुले, नारायण सोनवणे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी दिव्यांग बांधव यांना मार्गदर्शन केले. उपस्थित दिव्यांग बांधवाना कानाची मशीन, बॅटरीवरील सायकल, हाताची सायकल, कृत्रिम अवयव, अंध व्यक्तींसाठी स्मार्टफोन, आदी वस्तू मोफत देण्यात आल्या. यामुळे दिव्यांग बांधवानी संस्थेचे आभार मानले आहेत.

Exit mobile version