| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील वंजारपाडा येथील राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट येथे ट्रस्टचे अध्यक्ष भरत मेहरा यांच्या माध्यमातून वर्षभर सुरु असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या कामामुळे यावर्षी हिवाळ्यात अधिक प्रमाणात ब्लँकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी 3000 ब्लँकेट वाटप करण्याचा संकल्प केला आहे. ट्रस्टच्या कार्यकर्त्यांकडून या भागातील आदिवासी वाड्या झेंड्याची वाडी, उंबरवाडी, गिऱ्याचीवाडी, चिंचवाडी, गुडवणवाडी, तसेच आजूबाजूच्या परिसरातील उपस्थित सर्वांना ब्लँकेट व साडीचे वाटप करण्यात आले. तसेच जितेवाडी आणि कुंभेवाडी येथे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी अनेक वस्तूंचे वाटप केले जात असते. त्यात हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा म्ह्णून ब्लँकेट तसेच उन्हाळ्यात पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाण्याचे टँकर तीन ते चार महिने सुरु असतात. तर पावसाळ्यात हजारो छत्र्या आणि रेनकोट हि ट्रस्ट दरवर्षी देत असते.







