आदिवासी बांधवांना जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप

। चौक । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील आनंद आदिवासीवाडी येथे 81 जणांना जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तत्कालीन तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी आदिवासी समाजाच्या नागरी समस्या, मुलभूत गरजा भागविण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्रात मुलांना प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करणे, आदिवासी भागात कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले, लसीकरण करून घेण्यासाठी जनजागृती करणे, स्वच्छता मोहीम राबविण्यात येतात. तसेच जातीच्या दाखल्यासाठी एकत्र कॅम्प घेऊन तयार झालेले जातीचे प्रमाणपत्र नुकतेच आदिवासी वाडीत जाऊन पत्रकार अर्जुन कदम, तलाठी अमोल बोराटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ज्यांचे शिल्लक आहेत त्यांच्यासाठी पुन्हा कॅम्प घेण्यात येणार असल्याची माहिती तलाठी अमोल बोराटे यांनी दिली.

Exit mobile version