आदिवासी बांधवांचे दाखले वाटप

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील विंधणे कातकरीवाडीवर विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि नायब तहसीलदार नरेश पेडवी यांच्या हस्ते जातीचे दाखले,रेशन कार्ड, ई-श्रमकार्ड, वन हक्क दावे, मागील दोन वर्षात तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले काढण्यासाठी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले.सर्व कुटुंबांना नवीन आणि विभक्त रेशनकार्ड देण्यात आले आहेत. वन अधिकारी शशांक कदम,शीतल पाटील यांनी मंजूर झालेले वन हक्क दाव्यांचे सनदीचे वाटप केले.तसेच विंधने ग्राम पंचायतकडे आदिवासी विकासासाठी असलेला 15% निधी तून खुर्च्या व स्वयंपाकासाठी भांडी देण्यात आली.आदिवासी महिलांनी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने नृत्य करून उपस्थित सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार अंधारे नायब तहसीलदार नरेश पेडवी प्रा राजेंद्र मढवी, सुधाकर पाटील उपस्थित होते.

Exit mobile version