ग्रामीण महिलांना कुक्कुट पिल्लांचे वाटप

पशुसंवर्धन विभागाचा अनोळखा उपक्रम

| उरण । वार्ताहर ।
ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण अंतर्गत उरण पंचायत समिती सेस फंडातून ग्रामीण महिलांना उरण तालुक्यात 50 टक्के अनुदानावर एक दिवसीय संकरित कुक्कुट पिल्लांचे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावातील एकूण 50 शेतकरी महिलाना हे वाटप करण्यात आले आहे.

तालुक्यात कुक्कुट पालन व्यवसाय वाढण्यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे विविध प्रयत्न करण्यात येतात. तालुका पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. अनिल धांडे याच्या मार्गदर्शनाखाली त्याची टीम शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. त्यात पन्नास टक्के अनुदानातून संकरित जातीच्या गाई,म्हैसी त्याचप्रमाणे शेळी पालनासाठी शेळी गट वाटप केले जातात.

त्याअनुषंगाने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी छतरसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावातील सुमारे पन्नास शेतकरी महिला लाभार्थींना पंचायत समितीच्या पन्नास टक्के अनुदानावर एक दिवसीय संकरित कुक्कुट पिल्लांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये कावेरी, आर आय आर, सोनाली अशा जातीच्या पिल्लाचा समावेश आहे. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे डॉ.महेश सावंत, डॉ.संतोषसिंग डाबेराव,डॉ.महेश शिंदे,कर्मचारी प्रमोद मोकल,गोंधळी यांच्या सह पशुसंवर्धन विभाग उरण मधिल इतर डॉक्टर, कर्मचारी वर्गांनी एक दिवसीय कुक्कुट पिल्ले वाटपासाठी मेहनत घेतली.

Exit mobile version