| रसायनी | प्रतिनिधी |
पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत रसायनी पाताळगंगा येथील पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रमोल केमिकल लिमिटेड यांच्या संयुकृत विद्यमाने खैरणे एमआयडीसीत प्लास्टिकबंदी जनजागृती मोहीम राबवून दोन हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत दोन हजालर कापडी बॅग नागरिक व कामगार वर्गामध्ये वाटण्यात आल्या. प्लास्टिकचा वाढता वापर थांबविणे, पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करणे आणि स्वच्छ पर्यावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. प्रसोल केमिकल लिमिटेड व पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट हे दोन्ही संस्थान पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्यरत असून समाजामध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रभागी असतात. या कार्यक्रमास शोभा शेट्टी, मनोज काकड, अरुण जाधव, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच प्रसोल केमिकल लिमिटेडचा स्टाफ उपस्थित होता.






