चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते महादेवखार येथे कापडी पिशव्यांचे वाटप

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील ज्येष्ठ शेकाप नेते गोवर्धन कांडणेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. या निमित्ताने आयोजित द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात महादेवखार येथील ग्रामस्थांना कापडी पिशव्यांचे वाटप चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी गावातील विकासकामांची पाहणी केली. तसेच स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याच दौर्‍यात त्यांनी गोफण येथील राम शिंगरे यांच्या कुटुंबियांची तसेच यशवंतखार येथील नंदकुमार म्हात्रे या कुटुंबांची देखील सांत्वनपर भेट घेतली.

याप्रसंगी त्यांच्या समवेत गणेश मढवी, हेमंत ठाकूर, विनायक धामणे, लियाकत खोत, गोपीनाथ गंभे, विकास भायतांडेल, अमोल शिंगरे, शशिकांत कडू, रमेश सातामकर, नारायण गायकर, यशवंत शिंदे, राज जोशी, काशिनाथ भोईर यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version