| महाड | प्रतिनिधी |
महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावातील पालक अधिकारी यांची नियुक्ती आणि पालक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच आपत्ती साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला तहसीलदार महेश शितोळे, मुख्याधिकारी कोळेकर उपस्थित होते.
महाड प्रांताधिकारी पोपट ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी तालुक्यातील पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी आढावा बैठकदेखील घेण्यात आली. महाड नगरपालिकेच्या आवारात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील आपदा मित्र आणि संस्थांना आपत्ती साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदर साहित्य वाटप करताना त्याचे प्रत्यक्षदेखील प्रात्यक्षिक घेण्यात आले व त्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या, तसेच महाड तालुक्यातील साळुंके रेस्क्यू टीम व सिस्केटीम यांनादेखील साहित्याच्या किट देण्यात आल्या.