शेकाप, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार
| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कामोठेमधील कातकरी-आदिवासींना दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. गरीब-वंचितांनादेखील दिवाळीचा आनंद लुटता यावा, त्यांच्या घरीदेखील गोडधोड फराळ व्हावा यासाठी माजी आ. बाळाराम पाटील आणि पनवेल महानगर पालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सूचनेनुसार साखर, मैदा, रवा या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. नगरसेवक प्रमोद भगत, मा. नगरसेवक शंकर म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे, ज्येष्ठ शेकाप पदाधिकारी नाना भगत, सुनील भेंडे, अल्पेश माने, सचिन झणझणे, महिला शहर अध्यक्षा उषा झणझणे, महिला कार्याध्यक्षा शुभांगी खरात आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.