ग्रामपंचायतीतर्फे डस्टबिनचे वाटप

। कोर्लई । वार्ताहर ।

ग्राम स्वच्छता अभियानात ‘स्वच्छ गाव सुंदर गाव’ कार्यक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीतर्फे सरपंच अजय नाईक व उपसरपंच निलेश गायकर यांच्या हस्ते नुकतेच मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले. यावेळी खानाव गृप ग्रामपंचायतीतर्फे परीसरातील 9 महसुली गावे व 4 वाड्यांना घरपट्टी प्रमाणे मोफत 2 डस्टबिन असे एकूण 3000 डस्टबिन वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच अजय नाईक, निलेश गायकर, संदेश पडवळ, निधी नयन पाटील, विजय गायकर, योगेश गुजर, संदेश शिंदे, महेंद्र म्हात्रे, सतीश म्हात्रे, गजानन पाटील, प्रमोद, नितीन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version