| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड शैक्षणिक विकास विश्वस्त निधी या संस्थेने आपटवणे शाळेतील आदिवासी, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेणे व सदस्य युवराज महाजन, माजी प्राध्यापक पालीवाला कॉलेज तसेच सदस्या श्रीमती सागळे उपस्थित होत्या.
या संस्थेने शाळेतील आदिवासी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला म्हात्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी शाळेचे शिक्षक वृंद गणेश म्हात्रे, सीमा वैद्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.