महाड तालुक्यात शैक्षणिक साहित्य वाटप

| महाड । वार्ताहर ।
कोकण विभाग शिक्षक आ. बाळाराम पाटील यांच्या सन 2021 -2022 या निधीतून महाड तालुक्यातील 30 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कोकण एज्युकेशन सोसायटीचे वि. ह. परांजपे विद्यामंदिर महाड येथे करण्यात आले. महाडमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना शे.का.पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक शिक्षक मित्र देवा पाटील, सुशांत पाटील, सुनील पाटील, अमित भोईर, रोशन गावंड, अरुण उतेकर, श्री. राठोड, अल्पना मेहता, सुचित्रा तेंडुलकर, गणपत शेलार इत्यादी उपस्थित मान्यवर होते. आ. पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून शिक्षक मित्र देवा पाटील यांनी शिक्षक आमदार यांच्या शैक्षणिक साहित्याच्या वाटपाबाबत सर्वांना माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साळवे यांनी केले. या कार्यक्रमाला महाड तालुक्यातील 30 शाळांमधील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Exit mobile version