शैक्षणिक साहित्य वाटप; आ.बाळाराम पाटील यांची मदत

। खांब-रोहे । वार्ताहर ।
कोकण शिक्षक मतदार संघाचे आ.बाळाराम पाटील यांच्या वैयक्तिक स्थानिक आमदार निधीतून शाळापयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप रोहा येथील कोएसो मेहेंदळे हायस्कूलमध्ये तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांना करण्यात आले.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व रोहा तालुका शाळा निरीक्षक, आ.बाळाराम पाटील यांचे विश्‍वासू, पनवेल तालुका कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती, संचालक मोहन कडू उपस्थितीत सदर साहित्याचे वाटप त्यांच्याच हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी हे साहित्य वाटप करण्यासाठी शेकाप नेते मोहन कडू, मेहेंदळे हायस्कूल प्रा.रमेश मोसे, शेकाप नेते प्रकाश नाईक, विरजोली हायस्कूल मुख्याध्यापक विनय मार्गे, चिल्हे हायस्कूल मुख्याध्यापक दिपक जगताप, नारायण पानसरे, पर्यवेक्षक टि.एल.म्हात्रे, किशोर पाटील, गणेश लांगी, सुनिल थिटे, विशाल सोनकर, अमोल पाटील इत्यादी शिक्षक वर्ग उपस्थित होते.
फोटो ओळ
आम.बाळाराम पाटील यांच्या माध्यमातून मेंहेंदळे हायस्कूल रोहा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करतानाचे छायाचित्र.

Exit mobile version