| सोगाव | वार्ताहर|
अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील बामणसुरे येथील आदिवासी वाडीवर सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रतीक दामोदरे व प्रमिला प्रतीक दामोदरे यांचा मुलगा आदित प्रतीक दामोदरे 10 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या खाऊच्या व वाढदिवसाच्या पैशांची बचत करून सदर मदत आदिवासी विद्यार्थी बांधवांपर्यंत पोहचवली. विद्यार्थ्यासाठी गणवेश, दप्तर, वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाटी, पट्टी, घड्याळ आदी वस्तूंचा समावेश होता. यावेळी सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे प्रसन्न ठाकूर, किसन गायकवाड, परेश सुर्वे, ओंकार आमले आणि शार्दूल विजय काठे या उपस्थित होते. अंगणवाडी सेविका रीना चिंबूलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.





