। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
गजराज ग्रूप -पुणे यांच्या तर्फे परळी केंद्रातील जि. प. शाळा नेरे आदिवासी व अंगणवाडीतील मुलांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे नेरे आदिवासी शाळेची दुरवस्था झाली होती ती पाहून गजराज संस्थेने शाळेला पुन्हा सुसज्ज करण्याचे ठरविले .त्यानुसार इमारतीच्या भिंती नीटनेटक्या करून खिडक्या, लोखंडी कपाटे, गंजलेल्या स्वरूपात होत्या तसेच शाळेचा परिसर स्वच्छ करून इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली. तसेच गजराज ग्रुपच्या महिला आणि गावातील महिला एकत्र येऊन शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सलग दुसर्या वर्षी कोविडमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले होते. मात्र या विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे चालू राहण्यासाठी विद्यार्थी निहाय दप्तर, कंपास, पेन, पेन्सिल, जँकेट, छत्री, रंगीत खडू, इ.शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर सर्व शाळांचे शैक्षणिक साहित्य मुख्याध्यापक प्रविण माडेवार यांना गजराज ग्रूपचे अध्यक्ष सनी जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.
या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी गजराज ग्रुपचे अध्यक्ष सनी जगताप, ग्रुपचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्या माई पवार, महेश ठाकूर, बा रायगड परिवारातील प्रतिक सुर्वे तसेच ग्रामस्थ महिला आदी मान्यवर उपस्थितीत होते.