रातवड विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप

| माणगाव | प्रतिनिधी |

माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर क्रिकेट संघटना, महाड यांच्यावतीने गुरुवारी (दि.15) जानेवारी रोजी माध्यमिक विद्यामंदिर, रातवड विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहन देणे व त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते.

कदम यांनी संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून अभ्यासात सातत्य ठेवावे, असे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version