| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघटना महाडच्यावतीने माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात बुधवार (दि.4) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर क्रिकेट संघटनेच्यावतीने विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहाय्यभूत व्हावे या उद्देशाने संघटनेच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रतिवर्षी करण्यात येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने संघटनेचे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.