। नेरळ । प्रतिनिधी ।
पोशीर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा अलिबाग अर्बंन सहकारी बँकेचे संचालक अनिल जोशी यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि.19) सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धा, आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल रायगडावर घेऊन जाण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे.
अनिल जोशी यांनी पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा देवपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करून शाळेला स्वखर्चाने R.O. (वॉटर फिल्टर) भेट दिला. तसेच चिंचवाडी उंबरवाडी, गिऱ्याचीवाडी, वाघ्याची वाडी येथील प्राथमिक शाळेत सुमारे 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल रायगडावर घेऊन जाण्याचा संकल्प केला असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पोशीर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चन्द्र निरगुडा, सदस्य दत्तात्रेय राणे, अनिल जोशी यांच्या पत्नी रेश्मा जोशी, सुरेश राणे, मधुकर गिरा, दशरथ पारधी, वामन भगत, अनिल भगत, रुपाली राणे, ग्रामस्थ आणि शाळेतील सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
