पत्रकारदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पनवेल पत्रकार मंचाचा स्तुत्य उपक्रम
| पनवेल | प्रतिनिधी |
पत्रकार दिनाचे निमित्त आणि ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊचे वाटप केले. तसेच गेल्या दोन शैक्षणिक वर्षांत नैपुण्य प्राप्त केलेल्या मंचातील सदस्यांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला. मराठी वृत्तपत्र क्षेत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मंचाचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या, पेन असे शैक्षणिक साहित्य तसेच टूथपेस्ट, टूथब्रश, मास्क असे स्वच्छता किट आणि खाऊचे वाटप करण्यात आले.


भोकरपाडा येथे झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष माधव पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, उपाध्यक्ष हरीश साठे, खजिनदार नितिन फडकर, विवेक मोरेश्‍वर पाटील, संजय कदम, अविनाश कोळी, अनिल कुरघोडे, अनिल भोळे, राजेंद्र पाटील, राजू गाडे, प्रवीण मोहोकर, मयूर तांबडे, भरतकुमार कांबळे, सुनील राठोड, स्वर्गीय बाबू हशा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय पाटील, खजिनदार रुपेश फुलोरे, कल्पेश फुलोरे, हनुमान फुलोरे, किशोर फुलोरे, शिक्षिका समृद्धी सुधीर पाटील, प्रकाश राजगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण मोहोकार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Exit mobile version