शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

| मुंबई | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त भायखळा विभागात तरुणांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. महाराजांचा आदर्श घेत समाजहिताचे नवनवे उपक्रम राबवण्यात संघटनेचा कल असतो. त्यामागे छत्रपतींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रमाणिक प्रयत्न असतो.

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर साजरी करण्यात आली. भायखळ्यातील भीमनगर येथे तरुणांच्या पुढाकाराने साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. यावर्षी शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांसकट बच्चे पार्टी आघाडीवर होते. वेशभूषा स्पर्धेमुळे बाल शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, आदी महापुरुष बालरूपी भायखळ्यात अवतरले. बाल कलाकारांनी साकारलेले ऐतिहासिक पात्र लोकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तसेच या कार्यक्रमाला देशभक्तीचे स्वरूप प्राप्त झाले.

तरुणांच्या वतीने आणि नवतरुण उत्सव मंडळाच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. या उपक्रमाचे नागरिकांनी तोंडभर कौतुक केले. शेवटी विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज कदम, जितेंद्र कदम, सुजल शिर्के, रोहन कांबळे, तुषार सरोदे, सुजल पवार, प्रतिक पवार, अक्षय पवार, आर्दश जाधव, आशिष जाधव, योगेश गायकवाड, चंदन ठाकुर, जय सुर्वे, सुमेध सुर्वे, आदिराज जाधव, कार्तिक शिर्के, मोक्ष आगने, नितीन सोनवणे, मुकेश शिर्के, राकेश शिर्के, श्रीकांत वाढाणे, स्वप्निल रोकडे यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version