| म्हसळा | वार्ताहर |
गणेशोत्सवाचे औचित्य साधून दि. 8 सप्टेंबर रोजी राजिप शाळा चिखलप आदिवासी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वही आदी साहित्याचा समावेश होता. ठाकरोली गावचे सुपुत्र महेंद्र जाधव यांच्या माध्यमातून नेहमी असे शालेय उपक्रम तालुक्याच्या ठिकाणी राबविण्यात येत असतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, मनोगत व्यक्त करताना महेंद्र जाधव यांनी सांगितले की, या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक करावे. जे सहकार्य लागेल, ते आपल्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करू यात शंका नाही. आपले आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी नेहमी सहकार्य असेल, तसेच आपल्या शाळेत शिकून पुढील अभ्यास दहावी आणि बारावी करत असलेल्या विद्यार्थ्यांना करिअरसाठी काही अडचणी आल्यास नक्कीच सहकार्य करण्याचे जाधव यांनी मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाला महेंद्र जाधव, आदर्श शिक्षक बेटकर, स्वरा जाधव, शिक्षणप्रेमी नितेश जाधव, नरेंद्र विचारे, प्रल्हाद जाधव, शाळा समिती अध्यक्ष संतोष मुकणे, ग्रामपंचायत सदस्य मोहन पवार, पोलीस पाटील रवींद्र पवार, पालक नरेश पवार, रेष्मा पवार, मुक्ता वाघे, सविता जाधव, कलाशिक्षक दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.