पेण, भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे दर वाढले; कोथिंबिर 100 रु. जुडी, मटार 250 रु. किलो
। गडब । वार्ताहर ।
गणेशोत्सवात शाकाहारालाच पंसती असल्याने या कालावधीत जेवणामध्ये भाज्यांचाच वापर केला जात आसल्याने भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पेण-वडखळ बाजारात भाजी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तर स्थानिक भाजीलाच जास्त मागणी आसल्याचे दिसत आहे. तर भाज्याचे दर किलोमागे 30 ते 49 रुपयांने वाढले आहेत. तर कोथिंबिर जुडी 100 रुपये दराने विकली जात आहे.
भाज्याचे मागील महिन्यात जे दर होते त्यापेक्षा 30 ते 40 रुपयांनी वाढले असले तरी ग्राहक मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करत असुन भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. विशेष करुन पेण येथील कृषी उत्पन्न समितीच्या भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी विक्री होत आहे.
तर आता बाजारात वांगी 60 रुपये किलो, भेंडी 60 रुपये किलो, टॉमेटो 50 रुपये किलो , मटार 250 रुपये किलो मिरची 60 रुपये किलो, गवार 50 रुपये किलो, फरसबी 60 रुपये किलो, फ्लॉवर 80 किलो, कोबी 30 किलो, शिमला मिरची 60 किलो गाजर 60 किलो, बीट 60 किलो, शेवग्याच्या शेंगा 50 किलो रुपये दराने विक्री होत होत आहे. कोथीबिर 100 रुपये जुडी, मेथी 20 ते 30 रुपये जुडी. पेण परिसरात भेंडी, शिराळा, कारली, काकडी व पालेभाज्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते या भाज्याना मागणी वाढली आहे. तरी या भाज्यामध्ये वांगी, टॉमेटो, मिरची, कोथिंबिर या भाज्यांची आवश्यकता आसल्याने आसल्याने दर वाढले असले तरी भाज्या खरेदी कराव्याच लागतात. गणेशोत्सवात पूजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आसल्याने जेवणामध्ये भाज्याचाच वापर होत आसल्याने भाजी खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे.