विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

| पाली | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद पाच्छापूर शाळेतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन एस. एच. इ. एल. एफ ड्रिलींग कंपनीने चंद्रमोहन फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच्छापूर शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या एकूण 992 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किटचे वाटप केले. या किटमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, कंपासपेटी, चित्रकला वही, 5-200 पानी वह्या, दोन पेन, फेब्रिक्स कलर बॉक्स, ऑक्सफर्ड डिक्शनरी, वॉटर बॉटल आणि कॅन्कू कॅल्क्यूलेटर इत्यादी साहित्याचा समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे रुपेश गिते व सहकारी आणि कंपनीच्या वतीने विजय सांगळे उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांना ही मदत मिळवून देण्यासाठी शाळेचा माजी विद्यार्थी सिद्धार्थ गायकवाड याने मोलाचे सहकार्य केले. या मदतीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे यांनी शाळेच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमासाठी जनार्दन भिलारे, धनाजी कोपनर, रमेश पवार व कमलाकर तांडेल हे शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version