विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

| पनवेल | वार्ताहर |
आई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि खारघर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख गुरूनाथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद नवीन शाळा ओवेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप करण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांना पेन्सिल, पेन, कंपास असे शैक्षणिक साहित्याचे तसेच वह्या वाटप करण्यात आले. यावेळी गुरूनाथ म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा पाटील, केळवणे ग्रामपंचायत सदस्य विनायक गावंड, मुख्याध्यापक धुमाळ मॅडम, परवीन गारी, हलिमा कुरेशी, रेश्मा शेख, रुपेश सुतार, रुपाली केवाले-संपदा, वैशाली, कमलाताई तसेच शिवसेना महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी व आई सेवा भावी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना वह्या, खाऊचे वाटप

| नाते | वार्ताहर |
महाड तालुक्यातील गोंडाळे ग्रामपंचायत हद्दीमधील राजिप शाळा गौळवाडी, राजिप शाळा शेडगेकोंड आणि राजिप शाळा सुतारकोंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश महाडिक, सरपंच आशिष खताते, उपसरपंच घनश्याम शेडगे, ग्रा.पं. सदस्या ललिता वाजे, राजश्री शेडगे, माजी पो.पा. शंकर महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांनी वह्या आणि खाऊ मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला.


यावेळी प्रमुख पाहुणे निलेश महाडीक, सरपंच आशिष खताते, मा. पोलीस पाटील शंकर महाडीक, राजिप शाळा गोंडाळे गौळवाडी मुख्याध्यापक श्री. गरड, राजिप शाळा गोंडाळे शेडगेकोंड मुख्याध्यापक श्री. वाडेकर, राजिप शाळा गोंडाळे सुतारवाडी मुख्याध्यापक संगिता बारगजे आदींनी आपली मनोगते व्यक्त करून मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. गरड, श्री. वाडेकर, सौ. निकम, संगिता बारगजे, अंगणवाडी सेविका दिपाली शेडगे, प्राईड इंडियाचे दीक्षा तांबडे, संदेश साळवी, श्री. वाडेकर, सीताराम सुतार, बिभिषेण कदम, किसन पार्टे, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मदतीचा हात

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्टकडून कळंबोली येथील राजिप शाळेत साहित्य वाटप करण्यात आले. शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या कळंबोली शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पुरणारे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी श्री साई ट्रस्टचे अध्यक्ष गणेश अय्यर, तसेच लक्ष्मी अय्यर, संचालक राधिका घुले, कळंबोली उपसरपंच तसेच शाळेचे मुख्याध्यापक नागरगोजे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

| महाड | प्रतिनीधी |

समाज विकास सेवा संघ ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी संस्था म्हणून परिचित आहे. केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणे एवढेच या संस्थेचे कार्य नाही, तर या संस्थेचे काम सर्वस्वी आगळेवेगळे आहे. मुलांच्या अंगी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गुण सुप्तावस्थेत असतात. त्या गुणांचा शोध घेऊन ते विकसित करण्याचे काम ही संस्था गेली 15 वर्षे राज्यभर करत आहे. महाड तालुक्यातील 17 शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी सदर संस्थेचे संस्थापक विनय मिश्रा यांनी प्रतिपादन केले.


यावेळी तालुक्यातील चिंभावे, बेबलघर, तेलंगे, वलंग, आदीस्ते, खैरे तर्फे तुडील, सोनघर, कुंबळे, रावढळ, गोठे, सव, मुठवली, चोचिंदे, शिरगाव या शाळांमधील विद्यार्थ्यांना मुंबई येथील समाज विकास सेवा संघ या संस्थेच्या वतीने मोफत नोटबुक आणि कंपोस आदी शैक्षणिक साहित्य वितरण करण्यांत आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक विनय मिश्रा, अध्यक्ष ॲड. पवन करकेरा, महासचिव कन्हैयालाल यादव, सचिव अनुपम सिंह, समाजसेवक राजेंद्र भागवत, महाड वनखात्यातील अधिकारी संजय भागवत, रघुनाथ पां. भागवत, चिंभावे सरपंच विक्रम मालप, माजी पोलीस पाटील विजय साळी आदी मान्यवर उपस्थित होते..

Exit mobile version