गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

युवा आधार संघटनेचा स्तुत्य उपक्रम

। खांब । प्रतिनिधी ।

समाजातील गरजू विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या युवा आधार संघटनेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीची प्रचीती दिली. संघटनेचे कार्याध्यक्ष चेतन नरेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात शंभरहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, पालिका गटनेते महेंद्र गुजर, नगरसेविका पुर्वा मोहिते, युवा आधार उपाध्यक्ष जितेंद्र गायकवाड, अक्षरवेल फाऊंडेशन अध्यक्ष सौरभ चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष खेरटकर, समाजसेवक बिलाल मोरबेकर, विलास कांबळे, विश्वनाथ जाधव, महेश तुपकर, यश फुलारे आदी मान्यवरांसह युवा आधार संस्थापक अध्यक्ष संदेश गायकवाड, कार्याध्यक्ष चेतन गायकवाड, उपाध्यक्ष सुमित आगळे, किशोर कान्हेकर, सरचिटणीस प्रफुल्ल कांबळे, महेंद्र थिटे, सल्लागार निलेश शेडगे, महिला अध्यक्षा कोमल गायकवाड, मुख्य प्रवक्त्या अदिती वाटवे, मुख्य समन्वयक अमित पेणकर, डिजिटल मिडिया समन्वयक अभिषेक सानप आदी उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास निश्चितच हातभार लागतो, असे मत उपनगराध्यक्ष अहमद दर्जी व गटनेते महेंद्र गुजर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थितांनी कार्याध्यक्ष चेतन गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि समाजसेवेच्या कार्याला अधिकाधिक यश लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. सामाजिक जाणिवेतून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. दरम्यान समाजसेवेचा वसा जपत, गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमची प्रेरणा देऊन गेला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अमित शिंदे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version