वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

माणगाव | वार्ताहर |
माजी राज्यमंत्री व शेकापची मुलुखमैदानी तोफ मीनाक्षीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकाप युवा नेते निलेश थोरे व पंचायत समिती सदस्या रचना थोरे यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष माणगाव तालुकातर्फे तालुक्यातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व लहान मुलांकरिता खाऊचे वाटप करण्यात आले.
युवा नेते निलेश थोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मीनाक्षी पाटील यांचा वाढदिवस प्रत्येकाने आपल्या घरावर शेकापचा लाल बावटा फडकावून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देताना शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर शेकापचा झेंडा फडकावून मीनाक्षी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. या वस्तूंच्या वाटपप्रसंगी शेकापचे तालुका कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, देगाव सरपंच बबी काटकर व उपसरपंच दिनेश गुगले तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून मीनाक्षी पाटील यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version