चाईल्ड केअर संस्थेतर्फे अन्नधान्याचे वाटप

। उरण । वार्ताहर ।
चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे उद्धव कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवघर स्टॉप, पागोटे ब्रिज झोपडपट्टीमध्ये 50 अन्न धान्य किटवाटप करण्यात आले तसेच 100 मास्क वाटप करण्यात आले.चाईल्ड केअर सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपून अनेक उपक्रम आजपर्यंत राबविले आहेत.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला कुणाल पाटील,विक्रांत कडू,आमोल डेरे,विपुल कडू,रोशन धुमाळ तसेच अन्न धान्य लाभार्थी उपस्थित होते. संस्थेचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन कुणाल पाटील यांनी केले.

Exit mobile version