सुधागडातील शेतकर्‍यांना मोफत सातबाराचे वाटप

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य
सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शेतकर्‍यांना मोफत घरपोच सातबारा वाटपाचा शुभारंभ महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीपासून करण्यात आला.
रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, गटविकास अधिकारी सुधागड पाली विजय यादव, नायब तहसीलदार, सरपंच, मंडळ अधिकारी, नांदगाव तलाठी, कोतवाल तसेच नगर येथे सुधागड पंचायत समिती सभापती रमेश सुतार, सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायण्णावार, नवघर ग्रामपंचायत सरपंच, सुधागड पंचायत समिती गट विकास अधिकारी विजय यादव, नायब महसूल तहसीलदार, सरपंच, मंडळ अधिकारी नांदगाव तलाठी कोतवाल यांच्या उपस्थितीत स्थानिक शेतकर्‍यांना डिजिटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख विषयक सातबारा उताराचे वाटप करण्यात आले. सुधागड तालुक्यामध्ये 33 महसुली गावांमध्ये 1930 सातबाराचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version