| सुधागड-पाली | वार्ताहर |
विविध कृषी विषयक योजनांसाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ॲग्रिस्टॅग योजनेच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि.22) करण्यात आला. या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी यासाठी 26 जानेवारी रोजी प्रांतअधिकारी सायली ठाकूर व तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ॲग्रिस्टॅग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा, नांदगाव, पाली, पेडली या महसुली गावांमध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 598 शेतकरी बांधवांनी ॲग्रिस्टॅग योजनेचा लाभ घेतला आहे. सुधागड तहसील कार्यालय व सर्व ग्रामपंचायत निहाय हे शिबीर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग सहभागी होताना दिसत आहे. यावेळी सुधागड महसुल नायब तहसीलदार डी. एम. अडसुळे, सर्व मंडळ, तलाठी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.