| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील कलाक्षेत्रातील सरगम संगीत अकॅडमीच्या 7 व्या वर्धापन दिन सोहळ्याला शेकापचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट दिली. यावेळी शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर कार्यक्रम ‘राग एक-रंग अनेक’ या गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. नरेश पाटील यांनी अल्पावधीतच 100 पेक्षा जास्त कलाकारांमधील गायनाचे गुण ओळखून त्यांना एक सुमधुर गायक बनवून आपले चांगले शिष्य निर्माण केले आहे. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासह सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री संजीवनी जाधव, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, माधुरी गोसावी, करुणा ढोरे यांच्या सह समस्त विद्यार्थीवृंद उपस्थित होते.