| रसायनी | वार्ताहर |
रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे जिल्हाभरात अतिशय चांगले काम आहे. या विभागाने आतापर्यंत घडलेल्या चोऱ्या, घर फोड्या, चैन स्नॅचिंग मधील आरोपी तसेच महाराष्ट्रासह परप्रांतातील आरोपी पकडून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. आतापर्यंत घडलेले सर्वच गुन्हे, तसेच अवैध शस्त्रांची वाहतूक करताना पकडण्यात आलेले गुन्हेगार, निवडणुकीच्या काळात केलेल्या प्रतिबंधक कारवाया व बोगस कारखाने यांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी गोष्टी व गुन्हे उघडकीस आणलेली आहे. आजतागायत केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल शासनस्तरावर वरिष्ठांकडून वेळोवेळी दखल घेऊन अभिनंदन करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी कर्मचारी यांचे विभागाचे काम करण्याची ऊर्जा प्रचंड वाढली आहे.