| रसायनी | वार्ताहर |
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची 367 वी जयंती रसायनी पाताळगंगा वाशिवली येथे मोठ्या उत्साहात पार पाडली. गेल्या पाच वर्षांपासून वाशिवली येथील रुपेश पाटील आणि त्यांचे सहकारी, किशोर पाटील, विजय शिंदे, रोहिदास शिवलेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पर्यावरण संवर्धनसाठी फळझाडे वाटप व प्लास्टिक बंदी जनजागृती म्हणून कापडी पिशवी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण जाधव, अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे बंधू बेडेकर, किशोर देवघरे, डॉ. संजय त्रिंबेके, मंदार पाटीलहे उपस्थित होते.
वाशीवलीत फळझाडे, कापडी पिशव्यांचे वाटप
