राष्ट्रवादीतर्फे रुग्णालयात फळांचे वाटप


। म्हसळा । वार्ताहर ।
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, गण अध्यक्ष अनिल बसवत, सतीश शिगवण, नाना सावंत, गजानन पाखड, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण असल्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून नियमांचे योग्य रित्या पालन करण्यात आले व प्रत्यक्ष रुग्णांना भेटून त्यांची विचारपूस करून धीर देण्यात आले.

Exit mobile version