वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप

पत्रकार घनश्याम कडू यांची सामाजिक बांधिलकी

| उरण | वार्ताहर |
आपल्या पत्रकारितेतून अन्यायाला नेहमी वाचा फोडणारे उरणमधील पत्रकार तथा उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील उरण कोर्टजवळ असलेल्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार घनश्याम कडू, सामाजिक कार्यकर्ते कैलास शिसोदिया, पत्रकार विठ्ठल ममताबादे, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो कालेल, औषध निर्माण अधिकारी संजय अमृतकर, समुपदेशक महादेव पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य भारती, अधिपरिचारिका कृपा पाटील, निवेदिता कोटकर, सुरक्षारक्षक मंथन म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी ललित पवार, टीबीएचव्ही अंकिता कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version