| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये पत्रकार भवन उभारण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सिडको प्रशासनाकडे केली आहे. उरणमधील प्रकल्पग्रस्त पत्रकार प्रसिद्धीच्या माध्यमातून सिडकोला नेहमीच सहकार्य करीत आले आहेत. तरी सिडको प्रशासनाने ज्या प्रमाणे नवी मुबंईत पत्रकार भवन उभारले आहे. त्याच धर्तीवर उरणमधील प्रकल्पग्रस्त पत्रकारांसाठीही द्रोणागिरी नोडमध्ये पत्रकार भवन उभारण्यात यावे अशी मागणीचे पत्र उरण तालुका मराठी पत्रकार संघाने सिडको प्रशासनाचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे दिले आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, दिलीप कडू, सचिव अजित पाटील, सदस्य आशिष पाटील आदी उपस्थित होते.