नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील अंत्राट वरेडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शाळेचे वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोना मास्क आणि सॅनिटायझर यांची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थ रवींद्र डायरे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर याचे वाटप केले. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी डायरे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. यावेळी शालेय समिती अध्यक्ष निलेश श्रीराम डायरे, ज्येष्ठ नागरिक गोपाळ डायरे तसेच रवींद्र पेमारे आदी उपस्थित होते.