शेकापचे यशवंत ठाकूर यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

उरण | वार्ताहर |
तालुक्यातील बोकडविरा गावचे रायगडभूषण यशवंत ठाकूर आपल्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप केले.तसेच महाराष्ट्र राज्य विद्युुत मंडळ बोकडविरा येथील झोपडपट्टीतील नागरिकांना मास्क,सॅनिटायझर,आणि खाद्य पदार्थांचे वाटप केले. ते महाराष्ट्र विधी सेवा समितीचे सदस्य तसेच शेकाप उरणचे 30 वर्षे सहचिटणीस कार्यरत आहेत. मागील 26 वर्षांपासून दरवर्षी स्वत:चा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करून गरीब विद्यार्थी आणि गरजूंना खाऊ व वस्तूंचे वाटप करून वाढदिवसाचा सुखद आनंद घेत असतात.

Exit mobile version