दीड हजार शेवग्याच्या रोपांचे वाटप

सरपंच रमेश गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम

| पाताळगंगा | वार्ताहर |

ग्रामपंचायत टेंभरी यांच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा शिवाय पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावा यासाठी शेवग्याच्या 1600 रोपांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय, या शेवग्याच्या शेंगा तसेच पाला यांना खूप मागणी असल्यामुळे साहजिकच यापासून मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाला आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे यावेळी सरपंच रमेश गायकवाड यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत टेंभरी परिसरात सारंग, टेंभरी, आसरोटी, वयाल, कोपरी तसेच आदिवासी वाड्या, अंगणवाडी, शाळा अश विविध ठिकाणी या वृक्षांचे वाटप करण्यात आले. हे वृक्ष घेताना प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले. यावेळी टेंभरी सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच अंजना भोईर, ग्रामसेवक गोकुळदास राठोड, सदस्या दर्शना फाटे, प्रतिभा भोईर, अर्पणा पवार, निताली बामणे, आशा कातकरी, स्वपना ठोंबरे, सदस्य रोशन गायकवाड, जनार्दन मुकणे, निखिल पाटील, निकेश ठोंबरे, संगणक परिचालक प्रगती मोरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version