आदिवासी समाजाला भांडी वाटप

| आगरदांडा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील वावडूंगी ग्रामपंचायततर्फे आदिवासी समाजातील लोकांना भांडी तर अपंग लोकांना चेकद्वारे रक्कम वाटप करण्यात आली आहे. वावडूंगी सरपंच ऋतुजा दीपेश वरणकर यांच्या अध्यक्षतेखाली या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीलम भुवड, उपसरपंच सुवर्णा भुवड, गौतमी मोरे, शाईनदा कडू, जयंत कासार, हरीचंद्र भेकरे, दीपेश वरणकर आदी उपस्थित होते. यावेळी ऋतुजा वरणकर यांनी ग्रामपंचायत माध्यमातून ही मदत करण्यात आली आहे. ग्रामपंचायतमधील 15 टक्के निधीमधून हे वाटप करण्यात आले आहे.

Exit mobile version