इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण

। उरण । वार्ताहर ।
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही पिरकोनकर समूहाच्या वतीने इको फ्रेंडली बाप्पा-2021 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट,विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा आणि कोव्हिड सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर आधारित परीक्षण झाले.
पर्यावरण पूरक उत्सव ही संकल्पना समजून घेऊन त्याप्रमाणे सजावट करणे हे कौशल्याचे आणि मेहनतीचे काम होते. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी प्रामाणिकपणे स्पर्धेचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत श्रीयश घरत यांना प्रथम क्रमांक, रोशन गावंड द्वितीय तर संकेत गावंड यांनी तृतीय क्रमांक प्राप्त झाला.या विजेत्यांंना आम्ही पिरकोनकर समूहाच्या वतीने गौरवण्यात आले.तसेच पिरकोन येथील तळ्यात बुडणार्‍या महिलांना वाचवणार्‍या अधिकार पाटील व प्रतीत पाटिल यांना आम्ही पिरकोनकर शौर्य सन्मान पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

Exit mobile version