कॅन्सरग्रस्त मुलांना शिधा वाटप

| पनवेल | वार्ताहर |

लायन्स डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 चाईल्ड कॅन्सर कमिटीतर्फे आसाम भवन येथील 145 मुलांना तीन महिने पुरेल, असा शिधा वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल ला. ए के शर्मा, एन आर परमेश्वरन, ला. संजीव सुर्यवंशी, माजी प्रांतपाल ला. मुकेश तनेजा आणि डिस्ट्रिक्ट चाईल्ड कॅन्सर कमिटी चेअरमन ला. संजय गोडसे उपस्थित होते. ला. संजय गोडसे यांनी हा उपक्रम आयोजित करण्याचा उद्देश सांगितला आणि या मध्ये डिस्ट्रिक्टमधील 18 क्लबनी सहभाग दिल्याचे सांगितले. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व क्लब आणि व्यक्तींचे आभार मानले. कमिटी सल्लागार ला. मुकेश तनेजा यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केले.

मुख्य अतिथी ला. ए के शर्मा यांनी सांगितले की, अशा प्रकारचे उपक्रम अतिशय गरजेचे आहेत आणि चाईल्ड कॅन्सर कमिटी ला. संजय गोडसे यांच्या नेतृत्वाखाली बहुमोल कार्य करत आहेत. सर्व सहभागी क्लब आणि व्यक्तींना ला. ए के शर्मा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ तुर्भे, पनवेल आणि पनवेल सरगम यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट चे विविध पदाधिकारी तसेच क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसाम भवनच्या वतीने लायन परिवाराचे आभार मानले.

Exit mobile version