। नागोठणे । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून संपूर्ण जगभरात सेवा सप्ताह राबविण्यात आला. नागोठणे लायन्सकडून नागोठण्यात विविध उपक्रमांनी राबविण्यात आलेल्या सेवा सप्ताहाचा समारोप शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून करण्यात आला.
नागोठणे लायन्स क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट ला. प्रकाश जैन यांच्या सौजन्याने कचेरी शाळेत पार पडलेल्या या अन्नदान कार्यक्रमाचा रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठण्यातील कचेरी शाळा, कन्या शाळा व जोगेश्वरी नगर शाळा या तीन शाळांतील एकूण 86 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमात ला. प्रकाश जैन यांनी आपल्या मनोगतातून कचेरी शाळेतील त्यावेळचे आपले शिक्षक व शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी नागोठण्याचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलींद धात्रक, ज्ञानेश्वर साळुंके, सुप्रिया काकडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. सखाराम ताडकर, चार्टड प्रेसिडेंट ला. प्रकाश जैन, उपाध्यक्ष ला. विशाल शिंदे, सेक्रेटरी ला. डॉ. अनिल गिते, एमजेएफ ला. विवेक सुभेकर, एमजेएफ ला. सुधाकर जवके, एमजेएफ ला. यशवंत चित्रे, ला. सुनिल कुथे, ला. संजय काकडे, ला. विजय शहासने, ला. दिपक लोणारी, ला. सिध्देश काळे, ला. सुजाता जवके ला. विद्या म्हात्रे आदींसह तिन्ही शाळांतील शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या.






