कन्या सम्रुद्धी मोहिमेतंर्गत रोपांचे वाटप

। खांब-रोहे । प्रतिनिधी ।
सामाजिक वनीकरण वनविभाग अलिबाग रायगड,परिक्षेत्र रोहा यांच्या वतीने कन्या सम्रुद्धी योजनेतंर्गत रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायत हद्दीतील महिलावर्गाला मोफत रोपांचे वाटप करून एक महिला एक झाड हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

ॐ नादब्रम्ह भजन मंडळ तर्फे ऑनलाईन अभंगवाणी स्पर्धा

या कार्यक्रमातंर्गत उपस्थितीतांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगून प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे मुलाबाळांसारखे संगोपन करून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करावे अशाप्रकारचे आवाहन उपस्थित अधिकारी वर्गानी करून ग्रा.पंचायत हद्दीतील महिलांना एक महिला एक झाड या अभिनव उपक्रमातंर्गत मोफत रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक वनिकरण परीक्षेत्र रोहाचे वनक्षेत्रपाल संजय पांढरकामे, पी.एम.पवार, एस.पी.जाधव, एस.डी.पाटील, सुरेश वाघमारे आदींसह रुपाली कोस्तेकर, मानसी लोखंडे, मृणाली मरवडे, पल्लवी गवळी, सुभाष बामणे, महादेव नाकटे, नारायण नाकटे, तुकाराम बामणे, अनंता मरवडे, राजेंद्र महाडिक, महेश महाडिक, गणेश जाधव, गणेश गायकर, सागर लाडगे, सुचिता वाघमारे, अक्षया वाघमारे, वनिता लोखंडे, कल्पना मानकर, ऋतूजा कुंभार उपस्थित होते.

Exit mobile version